घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर ; नवीन यादीत आपले नाव कसे तपासावे? नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची माहिती आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेची नवीन आणि अद्ययावत यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांना घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत ही यादी आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, तुम्ही तुमच्या गावातील पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती स्वतः तपासू शकता.
घरकुल योजनेची यादी तपासण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करून ‘PMAYG.in’ या नावाने सर्च करावे लागेल. यानंतर, दिसणाऱ्या पहिल्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा. वेबसाइट उघडल्यानंतर, तुम्हाला तीन आडव्या रेषांवर (मेनू) क्लिक करून ‘रिपोर्ट’ (Report) नावाचा पर्याय निवडायचा आहे. रिपोर्ट सेक्शनमध्ये, सर्वात खाली ‘H फोल्डर’ मध्ये जाऊन ‘Beneficiary details for verification’ या पर्यायावर टच करा.
















